नाशिकच्या अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश


वेगवान नाशिक

मुंबई : नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने आश्रमातील सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्वरित एक समिती स्थापन करून विभागाला सात दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत.

आजचे राशी भविष्यः आजचा दिवस या राशींना लाभ दायक ठरणार!

याबाबत दिनांक 27 नोव्हेंबर रोजी एका वृत्तपत्रात, नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याबाबतीत महिला व बालविकास विभागामार्फत सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संजय राऊतांना कोर्टाचे समन्स, दिले हे आदेश

शिवाय यासाठी समिती नेमण्यात येऊन पुढील सात दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्री लोढा यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान पिडित पाचही मुलींची वैद्यकिय तपासणीही करण्यात आली असून त्यांचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाल्याचे समजते. या घटनेवरून नाशिक शहरातील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून खऱ्या अर्थाने शहरातील आश्रमांचे ऑडिट करण्याची वेळ आल्याचे दिसते आहे.

महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी- उदयनराजे भोसले


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *