Nashik धक्कादायक, अंबड परिसरात कचऱ्याच्या डेपोत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळले स्री जातीचे अर्भक


वेगवान नाशिक

नाशिक : शहारात सध्या  मानव जातीला काळीमा फासणा-या अनेक घटना घडताना दिसत आहे. त्यामुळे नाशिक शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच नाशिकमध्ये सातत्याने स्री जातीचे अर्भक फेकल्याच्या घटना समोर येत असून अंबड परिसरातून अशीच संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.

आजचे राशी भविष्यः आजचा दिवस या राशींना लाभ दायक ठरणार!

दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी असाच प्रकार  पंडित कॉलनी परिसरात  समोर आला असून चक्क कचऱ्याच्या डेपोत प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत स्री जातीचे अर्भक फेकून दिले होते. त्यानंतर परत ही घटना ताजी असतांनाच अंबड परिसरात स्री जातीचे अर्भक पुन्हा आढळून आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमधून हलहळ व्यक्त केली जात आहे. 

Gold Price Today सोने खरेदी करण्यापूर्वी आजचे दर तपासा

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंबडच्या अंबिका नगर परिसरातील चुंचाळे शिवारात एक अर्भक अज्ञात व्यक्तीने फेकून दिले होते. मात्र, काही तासातच हे काही तासांचे अर्भक कुत्र्यांच्या तावडीत सापडल्याने  त्याच्या शरीराचा अनेक ठिकाणी चावा घेत लचके तोडले असल्याचं समोर आलं आहे.

या घटनेबाबत नागरिकांनी तात्काळ पोलिसांना ही बाब कळवली असून पोलीसांनीही तात्काळ धाव घेत पंचनामा केला आहे. तसेच याबाबत सोशल मीडियावर कारवाईची मागणी केली जात आहे.

या कंपनीच्या कर्मचार्‍यांची केली जाणार कपात, कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *