नाशिकः 6 मुलींवर बलात्काराच्या आरोपाखाली आश्रमचालकास अटक


वेगवान नाशिक

नाशिक : महाराष्ट्रातील नाशिक येथील एका आश्रमात मुलींवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आश्रमचालकावर 6 मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आश्रमाच्या संचालकाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे.

आजचे राशी भविष्यः आजचा दिवस या राशींना लाभ दायक ठरणार!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्रमातील आणखी काही मुलीही संचालकाविरोधात तक्रारी घेऊन पुढे येऊ शकतात.
पोलीस आता आश्रमात राहणाऱ्या सर्व मुलींची चौकशी करण्याच्या तयारीत आहेत. नाशिकचे पोलिस अधीक्षक किरणकुमार चव्हाण म्हणाले, ’23 नोव्हेंबरला एका मुलीने आश्रमाचा मालक तिच्यासोबत गैरवर्तन करत असल्याची तक्रार आमच्याकडे केली  असून आम्ही  गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये एवढ्या लाख तरूणांना मिळणार नोकरी

तसेच  आश्रमचालक त्यांचे शारीरिक शोषण करत असे, आत्तापर्यंत आणखी 5 मुलींनी त्यांच्या जबानीत म्हटले आहे. त्याच्यावर विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, आणखी 2 मुलींचे जबाब घेण्यात येत आहेत. याप्रकरणी कठोर पावले उचलत महाराष्ट्र सरकारने प्रधान सचिवांकडून 7 दिवसांत संपूर्ण तपास अहवाल मागवला असून याबाबत राज्याचे बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे.

रिपोर्ट्सनुसार, आश्रमात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी येथे शिकणाऱ्या इतर विद्यार्थिनींची चौकशी केली. या चौकशीत ५ मुलींनी आश्रमाचे संचालक हर्षल मोरे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत. पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की आरोप करणाऱ्या 6 पैकी 5 मुली अल्पवयीन आहेत. या प्रकरणी एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी आश्रमातच काम करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली.

शिवसेनेच्या नावावर व चिन्हाबाबत या तारखेला सुनावणी


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *