वेगवान नाशिक
चांदवड : तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात (दि.२८) सकाळी ११.३० वाजेदरम्यान चालत्या टेम्पो ट्रॅव्हल्सने पेट घेतल्याची घटना घडली असून टेम्पो जळून खाक झाला आहे.
आजचे राशी भविष्यः आजचा दिवस या राशींना लाभ दायक ठरणार!
दरम्यान मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक तीनवर (दि.२८) दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हल्स (एमएच 15 सीव्ही 5188) चांदवडकडून मालेगावकडे जात असताना टेम्पो तालुक्यातील राहुड शिवारात आला त्यादरम्यान टेम्पोमध्ये इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने टेम्पोला आग लागली आहे.
माझ्यावर हल्ला करण्याचा कट संजय राऊतांचा दावा
या आगीची माहिती मिळताच सोमा टोल कंपनी येथील अग्निशामक दलाच्या गाडीला प्राचारण करून आग विझवण्यात आली. सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे टेम्पो ड्रायव्हर संतोष बाळासाहेब सानप (वय 33, रा. पंचवटी, नाशिक) यांनी सांगितले. याबाबत अधिक तपास चांदवड पोलिस करीत आहे.
Gold Price Today सोने खरेदी करण्यापूर्वी आजचे दर तपासा