हा शेअर गुंतवणूकदारांना देत आहे जबरदस्त परतावा


वेगवान नाशिक

नवी दिल्लीः रेल विकास निगम लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या शेअरने (RVNL शेअर किंमत) अल्पावधीतच गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. आजही या शेअरमध्ये इंट्राडेमध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना येत्या काळात राजयोग

या PSU समभागाने आज 80.60 रुपयांच्या त्याच्या नवीन सार्वकालिक उच्चांकाला स्पर्श केला आहे. तर RVNL चा शेअर 9.35 टक्क्यांच्या वाढीसह 80.20 रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या एका महिन्यात स्टॉक 99 टक्क्यांनी वाढला आहे. अशा प्रकारे अवघ्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.

सीएनजी-पीएनजीचे दर होणार स्वस्त

रेल विकास निगम लिमिटेडचा शेअर मल्टीबॅगर परतावा देत असून गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये या समभागाने 32 टक्के परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात हा शेअर 99 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या 6 महिन्यांत या समभागाने गुंतवणूकदारांना 148 टक्के नफा दिला आहे. तर 2022 मध्ये हा स्टॉक 122 टक्क्यांनी वाढला असून त्याच वेळी, या स्टॉकमध्ये एका वर्षात 141 टक्के वाढ झाली आहे.

Mahindra XUV 400 EV भारतीय बाजारात या महिन्यात होणार लॉन्च

तसेच 1 महिन्यापूर्वी रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअरची किंमत रु.40.65 होती. आज ते रु.80.60 पर्यंत वाढले आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 198,277 रुपये झाले असते. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 246,860 रुपये मिळाले असते.

शेतक-यांचा नुकसान भरपाईबाबत सरकारला या तारखेपर्यंत अल्टिमेटम, नाहीतर..


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *