कर्नाटक-महाराष्ट्र सीमा विवाद प्रकरणी सुप्रीम कोर्टात या तारखेला होणार सुनावणी


वेगवान नाशिक

मुंबई : कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नासाठी एकनाथ शिंदे सरकारने चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. दोन्ही मंत्री 03 डिसेंबर रोजी कर्नाटकातील बेळगावीला भेट देतील. त्याचवेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी नवी दिल्लीत जाणार असल्याचे सांगितले.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना येत्या काळात राजयोग

दरम्यान  सीमावादाच्या संदर्भात महाराष्ट्रासोबतच्या कायदेशीर लढाईबाबतही त्यांनी ज्येष्ठ वकिलांशी चर्चा केली असून ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांची भेट घेण्यासाठी २९ नोव्हेंबरला दिल्लीला जाणार असल्याचे बोम्मई यांनी सांगितले. तर दोन्ही राज्यांमधील सध्या सुरू असलेल्या सीमा विवाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात 30 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

सीएनजी-पीएनजीचे दर होणार स्वस्त

तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधील बेळगाव जिल्हा, ज्याला बेळगावी म्हणूनही ओळखले जाते, हा भारतातील सर्वात मोठ्या आंतरराज्य सीमा विवादांपैकी एक आहे. तर 1956 मध्ये राज्यांची पुनर्रचना झाली तेव्हा हे क्षेत्र कर्नाटकच्या अंतर्गत आले. पूर्वी ते बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत होते, ज्याला आता महाराष्ट्र म्हणतात. प्रकरण वाढल्यावर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश मेहरचंद महाजन यांच्या नेतृत्वाखाली एक आयोग स्थापन केला असून हे प्रकरण अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

राष्ट्रीय नायकांची बदनामी थांबवावी राज ठाकरेंचे भाजप आणि काँग्रेसला आवाहन

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *