वेगवान नाशिक
दोन दिवसापूर्वी योगगुरू रामदेव बाबा यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे राज्यातीम वातावरण तापल होत. त्यानंतर या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून याबाबतीत दोन दिवसाच्या आत आपला खुलासा सादर करण्यासाठी नोटीस त्यांना पाठवण्यात आली होती. तर याबाबत रामदेव बाबांनी ईमेलद्वारे खुलासा करत माफी मागितली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना येत्या काळात राजयोग
माफीनाम्यात रामदेव बाबांनी म्हटलय, महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 नुसार मी कुठलाही अपराध केलेला नाही. मी जागतिक स्तरावर महिला सबलीकरणासाठी काम करत आलो आहे. जेणेकरुन महिलांना समाजात समानतेचा दर्जा प्राप्त होण्यास मदत होईल. भारत सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या योजनांना प्रोत्साहन दिलंय. इतकंच नाही तर महिलांचं समाजातील स्थान मजबूत करण्यासाठी विविध संघटनांच्या साथीने कामही केल आहे . त्यामुळे माझा महिलांचा अपमान करण्याचा माझा कोणताही उद्देश नसून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लीपमधून माझ्या शब्दांना चुकीचा अर्थ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
तुमचे या बॅंकेत खाते असेल तर या तारखेपूर्वी केवायसी अपडेट करा,अन्यथा..
तसेच मी एक तासाच्या लेक्चरमध्ये वस्त्रांसंबंधी जे वक्तव्य केलं, त्याचा अर्थ माझ्याप्रमाणे वस्त्रांप्रमाणे साधी वस्त्रं असा होता. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दांनी ज्यांना वाईट वाटलं त्यांची मी निरपेक्ष भावनेने क्षमा मागतो, असं रामदेव बाबा म्हणाले.
गुवाहाटी दौऱ्यावरुन रोहित पवारांचं शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र, म्हणाले..