वेगवान नाशिक
नाशिकः शहरातील सातपूर परिसरामध्ये सिटिलिंक या बसच्या एका वाहन चालकाला कट लागल्याने बसवर दगडफेक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना येत्या काळात राजयोग
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील सातपूर परिसरात त्र्यंबकेश्वर कडून एनआर ईएल या सिटिलिंक बसचा वाहतुकीच्या खोळंब्यामुळे एका चारचाकी वाहनाला कट लागला आणि कट लागल्याने संतापलेल्या वाहन चालकाने त्याच्या साथीदारांसह या बसवर दगडफेक केली आहे. यामध्ये बसची काच फूटून एक विद्यार्थी किरकोळरित्या जखमी झाला असून दर्शन पाटील असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.
महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर रामदेव बाबांचा माफीनामा
जखमी विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले आहे. अतिशय किरकोळ कारणावरून झालेल्या या दगडफेकीत बसचं नुकसान तर झाल आहेच परंतु मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा देखील झाल्याचं समोर आलेले आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस अधिक तपास करत आहेत.
सीएनजी-पीएनजीचे दर होणार स्वस्त