नाशिकः टेरेसवरून तोल जाऊन पडल्याने एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू


वेगवान नाशिक

नाशिकः अंबड परिसरातील दत्तनगर चुंचाळे येथील टेरेसवरून तोल जाऊन पडल्याने एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत अंबड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना येत्या काळात राजयोग

याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन शिवाजी मते रा. कृष्ण कुंज अपार्टमेट दत्तनगर चुंचाळे यांनी अंबड पोलिस ठाण्याला दिलेल्या माहितीनुसार त्यांचे वडील शिवाजी सखाराम मते हे राहत्या घराच्या अपार्टमेंटच्या टेरेसमधून तोल जाऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

हा शेअर गुंतवणूकदारांना देत आहे जबरदस्त परतावा

त्यानंतर त्यांना १०८ वरील अॅबुलन्सने डॅा. नाईक खताळ यांनी तपासून लागलीच मृत घोषीत केले आहे.

याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात फोनद्वारे संपर्क साधून माहिती देण्यात आली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस नाईक शिरवले  करीत आहे.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा विवाद प्रकरणी सुप्रीम कोर्टात या तारखेला होणार सुनावणी


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *