वेगवान नाशिक
नाशिक : शहरात सध्या लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून हिंदू संघटना चांगलीच आक्रमक झाली असून सर्व हिंदू संघटना एकवटल्या असून शहरात मुक मोर्चा काढण्यात आला आहे. तसेच श्रद्धा वालकरच्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी करत लव्ह जिहादचा मुद्दा हाती घेऊन हिंदू संघटना एकवटल्या आहेत.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना येत्या काळात राजयोग
दरम्यान शहरामधील हिंदू संघटना यांनी ठिकठिकाणी फलक लावून नागरिकांनी सहभागी व्हावे अशी मागणी केली होती. त्यानुसार हिंदू संघटनांच्या विराट मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे श्रद्धा वालकर प्रकरणात तपासाला गती देण्यात येऊन लवकरात लवकर आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतक-यांचा नुकसान भरपाईबाबत सरकारला या तारखेपर्यंत अल्टिमेटम, नाहीतर..
तसेच गोवंश हत्या बंदी, लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा करावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या असून भालेकर मैदान येथून मुक मोर्चा काढण्यात आला आहे. त्यानंतर या मागण्या मान्य न केल्यास पुढील काळात आक्रमक भूमिका घेऊ असाही इशारा दिला आहे.
सीएनजी-पीएनजीचे दर होणार स्वस्त