वेगवान नाशिक
मविआ सरकारच्या काळात शेतक-यांच्या वीज बिल काही काळापुरते स्थगित आणि मफ केले होते. मात्र कोरोनाच्या काळात मविआच्या सरकारने एका नव्या पैशाची सूट शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यावरूनच त्यांना बोलायचा अधिकार नसून त्या काळात इतके कनेक्शन कट केले आणि आत कोणत्या तोंडाने बोलत आहेत. आम्ही जे बोलतो ते करतोच. त्यामुळे जे बोलत आहेत त्यांनी जनाची आणि मनाची ठेवली पाहिजे”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि ‘मविआ’ सरकारवर निशाणा साधला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना येत्या काळात राजयोग
तसेच फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरेंवर टीका केली आहे.
दरम्यान मविआ सरकारने वीज बिल माफ करू असे मी कधीच म्हटले नव्हते. ज्यावेळेस कोरोना होता, त्या कोरोनाच्या काळापुरता मध्य प्रदेशने वीज बिल स्थगित आणि माफ केले होते. तेच पॅटर्न कोरोना करीता आणा असे सांगितलं होतं. पण तेव्हाचे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार इतके निर्दयी होतं की त्यांनी कोरोनाच्या काळात एका नव्या पैशाची सूट शेतकऱ्यांना दिलेली नसल्यामुळे त्यांना बोलायचा अधिकार नाही असं म्हटलं आहे.
राष्ट्रीय नायकांची बदनामी थांबवावी राज ठाकरेंचे भाजप आणि काँग्रेसला आवाहन
महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचं अनावरण आज करण्यात आले असून महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचेही तैलचित्र असायला पाहिजे, अशी संकल्पना होती. त्यात आता आमचे नवीन सरकार आल्यानंतर या संकल्पनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गती देण्यात आली”, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.
महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर रामदेव बाबांचा माफीनामा