महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी- उदयनराजे भोसले


वेगवान नाशिक

राज्यात राज्यपालांवर सगळ्या पक्षांकडून कडाडून टीका केली जात आहे.  राज ठाकरेंनी  देखील राज्यपालांचा समाचार घेतला असून यानंतर आता खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील राज्यपालांच्या वक्तव्याचा संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे असे म्हणत थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सीएनजी-पीएनजीचे दर होणार स्वस्त

दरम्यान उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपालांविरोधात आपला निषेध नोंदवला असून महाराजांचा अपमान होतो तेव्हा दुख वाटत नाही का? असा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला. तसेच महाराजांचा विचार जुना विचार म्हणता मग नवा विचार कोणता ते तरी सांगा असे उदयनराजे म्हणाले आहेत.

ब्रेकिंग! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होण्याची शक्यता

त्यानंतर पुढे ते म्हणाले महाराजांचे विचार चुकीच्या पद्धतीने नव्या पीढीसमोर मांडले जात असल्यामुळे याचा काय परिणाम होऊ शकतो याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा विवाद प्रकरणी सुप्रीम कोर्टात या तारखेला होणार सुनावणी


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *