वेगवान नाशिक
मुंबई : सध्या बेळगाव-महाराष्ट्र सीमावादावरुन दोन्ही राज्यांमधील राजकीय वातावरण तापल असून त्यात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील 40 गावांवर दावा सांगितला आहे. अशातच आता संजय राऊत यांना कोर्टाने समन्स बजावले असल्याने विविध चर्चांना उधाण आल आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना येत्या काळात राजयोग
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊतांनी 30 मार्च 2018 मध्ये बेळगावात भाषण केलं होतं. त्याच भाषणात त्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. याबाबत बेळगावातील स्थानिक पोलिसांनीच ठपका ठेवला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे याप्रकरणी काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
हा शेअर गुंतवणूकदारांना देत आहे जबरदस्त परतावा
दरम्यान संजय राऊत यांना प्रक्षोभक भाषणाप्रकरणी बेळगाव कोर्टाने समन्स बजावले असून 1 डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच हजर न राहिल्यास राऊतांवर अटक करणार असल्याचं बोललं जात आहे.
सीएनजी-पीएनजीचे दर होणार स्वस्त