ब्रेकिंग! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होण्याची शक्यता


वेगवान नाशिक

मुबंईः मागील काही महिन्यांपासून वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पदमुक्त होण्याची शक्यता आहे. तसे संकेत मिळत असून राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली दिली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना येत्या काळात राजयोग

त्यात सध्या राज्यात राज्यपाल यांच्याविरोधात अनेक नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून पदावरुन हटवण्याची मागणी होत आहे. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या राज्यात परत जाण्याची इ्च्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा विवाद प्रकरणी सुप्रीम कोर्टात या तारखेला होणार सुनावणी

तसेच राज्यपालांना आपल्या पदावरून मुक्त व्हायचे असेल तर त्यांना अगोदर पदाचा राजीनामा अथवा पदमुक्त होण्याबाबतचे पत्र राष्ट्रपतींना पाठवावे लागेल. त्यानंतर त्यांच्या पत्रावर कार्यवाही होईल. तशी केंद्र सरकारकडून राज्यपाल कोश्यारी यांची बदली देखील होऊ शकते. मात्र, ही बदली होणे म्हणजे राज्यपालांवर कारवाई करण्यात आली,असा संदेश देशभरात जाण्याची शक्यता असल्याने राज्यपालांकडून स्वत:हून पदमुक्त होण्याची इच्छा राष्ट्रपतींकडे व्यक्त केली जाण्याची शक्यता आहे.

शेतक-यांचा नुकसान भरपाईबाबत सरकारला या तारखेपर्यंत अल्टिमेटम, नाहीतर..

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *