वेगवान नाशिक
राज्यात यंदा झालेल्या अमिवृष्टीमुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण आतापर्यंत सरकारकडून कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर आणि पैठण या दोन तालुक्यांत शेतकरी आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना येत्या काळात राजयोग
दरम्यान याबाबत काल पैठणमध्ये शेतकऱ्यांची बैठक पार पडली असून, 4 डिसेंबरपर्यंत अनुदान मिळाले नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला असून आमची मागणी मान्य न झाल्यास कुठल्याही ठिकाणी कोणत्याही वेळात ‘जलसमाधी’ घेणार असल्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे.
महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर रामदेव बाबांचा माफीनामा
याबाबत पैठण आणि वैजापूर तालुका अतिवृष्टी अनुदानातून वगळल्यामुळे अन्नदाता शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची काल नाथसागर धरणाच्या पायथ्याशी बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने वैजापूरसह पैठण तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान देण्यापासून वंचित ठेवल्याचे परिपत्रक काढल्यामुळे शेतकऱ्यांमधील नाराजीवर चर्चा झाली. तसेच या बैठकीत 4 डिसेंबरपर्यंत सरकारला वेळ देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे यावरून आता राजकीय वातावरण देखील पेटण्याची शक्यता आहे.
सीएनजी-पीएनजीचे दर होणार स्वस्त