वेगवान नाशिक
मुंबई : सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली असून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते यांना 18 दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम गोखले यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशींवर शनिदेवांची राहणार कृपादृष्टी
विक्रम गोखले हे मराठी तसंच हिंदी चित्रपटसृष्टीतलं एक मोठं नाव असून त्यांनी अनेक मराठी,हिंदी सिनेमा, मालिकांसह रंगभूमीवरही आपल्या अभिनयाची छाप उमटवली. पण, आज या अभिनेत्यानं चाहत्यांमधून एक्झिट घेतली आणि अनेकांच्याच डोळ्यात अश्रू उभे राहिले. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये शनिवारी सायंकारी 4 वाजण्याच्या सुमारास गोखले याचं पार्थिव ठेवण्यात येणार असून सायंकाळी 6 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
योगगुरू रामदेव बाबांच्या वादग्रस्त विधानावरून संजय राऊतांचा सरकारला सवाल
गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्ण्यालयात उपचार सुरु होते. शनिवारी अचानक विक्रम गोखले यांची तब्येत बिघडली, त्यानंतर त्यांनी या जगाचा निरोप घेतला. तसेच डॉक्टरांनी विक्रम गोखले यांना व्हेंटिलेटरवरून काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रकृती पाहता त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवणे योग्य मानले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
एलआयसीने आणलीय खास योजना, मिळवा हे मोठे फायदे
गेल्या काही काळापासून घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातून संन्यास घेतला होता. सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देण्याचंही काम करत होते. विक्रम गोखले यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला असून या चित्रपटात त्यांनी जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे यांच्यासोबत काम केलं. या चित्रपटाच्या शूटिंगच्या आधीही ते रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळताच त्यांनी शूटिंगला सुरुवात केली होती.