वेगवान नाशिक
नवी दिल्लीः तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. या बँकेने आपल्या ग्राहकांना इशारा दिला असून ही चेतावणी खात्याच्या केवायसी अपडेटबद्दल आहे. PNB ने ग्राहकांना त्यांचे KYC 12 डिसेंबर 2022 पर्यंत अपडेट करण्यास सांगितले आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशींवर शनिदेवांची राहणार कृपादृष्टी
बँकेने म्हटले आहे की ज्या ग्राहकांनी त्यांचे KYC खाते अपडेट केलेले नाही, त्यांनी ते 12 डिसेंबर 2022 पर्यंत करावे. त्यांनी या कालमर्यादेपर्यंत केवायसी अपडेट न केल्यास खात्यातील व्यवहारांवर निर्बंध लादले जाऊ शकतात.
Realme 10 Pro Series 5G लवकरच भारतात होणार लॉन्च, मिळतील दमदार फिचर्स
याबाबत PNB ने ट्विट केले असून त्यामधे सांगितले, “RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, KYC अपडेट करणे सर्व ग्राहकांसाठी अनिवार्य असून ज्या ग्राहकांचे खाते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत KYC अपडेट केले गेले नाही आणि ज्यांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर नोटीस/SMS पाठवला गेला आहे, त्यांनी खात्याचे KYC अपडेट करण्यासाठी 12 डिसेंबर 2022 पूर्वी मूळ शाखेशी संपर्क साधावा. तसेच या अंतिम मुदतीपर्यंत अपडेट न झाल्यास, खात्यातील ऑपरेशन्सवर निर्बंध लादले जाऊ शकतात.
व्हॉट्सअॅप स्टेटसचे लवकरच येतय जबरदस्त नवीन फीचर्स, पहा कोणते