वेगवान नाशिक
राज्यातील राजकारणात सातत्याने काही ना काही कारणांवरून वाद सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यात गेल्या काही दिवसाआधी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी विधान केले होते, त्यात आता रामदेव बाबा यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे या अशा विधानावरून महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात असून राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र शब्दात निषेध करत.रामदेव बाबांवर ३५४ ड या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मागणी करावी असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशींवर शनिदेवांची राहणार कृपादृष्टी
तसेच आमच्यावर दुसरे कुठे गुन्हा दाखल करतात, तसे आता हिम्मत दाखवून खरे गुन्हे दाखल करावे. असेही त्यांनी म्हटले. त्यात
एकीकडे आपण स्त्रीला आदिशक्ती व देवीच्या भूमिकेत मानतो. महाराजांपासून आपण स्त्रीला मोठा स्थान देत आलो. आणि अशा पद्धतीने स्त्री जातीचा अपमान केला जातोय. तेही देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या समोर.
त्यामुळे रामदेव बाबां विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा. तो ही ३५४ ड या कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी माजी खासदार परांजपे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच रामदेव बाबांनी केलेल्या त्या विधानाला राष्ट्रवादीचा विरोध असून त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असल्याचेही परांजपे यांनी म्हटलय.
ज्योतिषांच्या भेटीवरून एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर