वेगवान नाशिक
मुंबईः राज्यात सध्या महिलांविषयी योगगुरू रामदेव बाबा यांनी आक्षेपार्ह केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात अमृता फडणवीस यांच्याविषयी विधान केल्यामुळे राजकारण चांगलच तापलं आहे. त्यामुळे रामदेव बाबांनी केलेल्या विधानावरून राज्यात संतप्त प्रतिक्रिया येत असून त्यावरून संजय राऊत यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांत टीका केली असून अमृता फडणवीस यांनाही खोचक शब्दांत सवाल केला आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशींवर शनिदेवांची राहणार कृपादृष्टी
दरम्यान योगगुरू रामदेव बाबा यांनी ठाण्यात योगाचे धडे देताना व्यासपीठावरूनच महिलांच्या कपड्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल असून महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात,असं लज्जास्पद विधान केलं आहे. तसेच अमृता फडणवीस पुरेसे अन्न खातात. पुढील शंभर वर्षं त्या म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण, त्या नेहमी आनंदी राहतात. जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर आहे, तसाच तुमच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे, असं रामदेव बाबा म्हणाले होते.
ज्योतिषांच्या भेटीवरून एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर
त्यामुळे यावरून राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना परखड शब्दांत टीका केली. ते म्हणाले, एका बाजूला तुम्ही महिलांच्या रक्षणाच्या, सबलीकरणाच्या गोष्टींसाठी कायदे बनवता, ज्ञान पाजळता. त्याचवेळी असंख्य महिलांसमोर एक बाबा भगव्या वस्त्रात महिलांचा असा अपमान करतो. तरी सरकार गप्प बसलंय. या सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीये का? एवढंच मला पाहायचंय, अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे सरकारला लक्ष्य केल आहे.
एलआयसीने आणलीय खास योजना, मिळवा हे मोठे फायदे