वेगवान नाशिक
मुंबईः राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या अनेक आमदारांसह गुहावटी दौ-यावर आहेत. तर एकनाथ शिंदे आमदारांसह गुवाहाटीत दाखल झाले असून त्यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहेत.अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर टीका केली असून हे माता कामाख्या देवी राज्यातील सामान्य माणसांच्या वतीने तुला प्रार्थना! सत्ता’बदला’साठी तू आशिर्वाद दिला पण आता बदल्याची भाषा थांबावी, असं म्हटलं आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशींवर शनिदेवांची राहणार कृपादृष्टी
पुढे रोहित पवार म्हणाले, राज्याचे उद्योग गुजरातने पळवू नये, युवांच्या नोकरीचा घास हिरावला जाऊ नये, महाराष्ट्राची बदनामी सहन करू नये, वाचाळ मंत्र्यांना तारतम्य यावं, अतिवृष्टीतील बळीराजाला मदत मिळावी, असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
ज्योतिषांच्या भेटीवरून एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर
तसेच ट्विटमध्ये ते म्हणाले की, राज्याची भूमी बळकावण्याची भाषा करणाऱ्यांना धडा मिळावा. तसेच अंधश्रध्दा, तंत्रमंत्र, जादूटोणा याला सरकारने बळी पडू नये. राज्याचा स्वाभिमान आणि अस्मिता अबाधित रहावी. हे अडचणींचे ‘डोंगर’ पार करण्यासाठीही जे-जे हवं ते सर्व राज्य सरकारला दे.! असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.