वेगवान नाशिक
नाशिकः नाशिकरोड परिसरात एका वडापाव विक्रेत्यावर जुन्या भांडणाची कुरापत काढत हल्ला झाल्याची घटना घडली असून विक्रेता गंभीर जखमी झाला असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशींवर शनिदेवांची राहणार कृपादृष्टी
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरातील टिळकपथवर विशाल गणपत गोसावी (रा. धनगर गल्ली, देवळाली गाव, नाशिकरोड) येथे या तरूणाचा वडापाव विक्रीचा गाडा असून तो नेहमीप्रमाणे विशाल व त्याचे कामगार ग्राहकांना वडापाव देत असताना अचानकपणे मयूर जानराव, तुषार जाधव, कमलेश जानराव, दिनेश खरे, मोगल दाणी (सर्व रा. भीमनगर, जेलरोड, नाशिकरोड) या टोळक्याने या ठिकाणी येऊन हातात कोयते व रामपुरी चाकू घेऊन दहशत निर्माण केली.
एलआयसीने आणलीय खास योजना, मिळवा हे मोठे फायदे
त्यानंतर फिर्यादीचे नातेवाईक तेजस गिरी याचे सोबत झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढून संबंधित टोळक्याने हल्ला करून दहशत निर्माण केल्यानंतर वडापाव विक्रेते विशाल गोसावी याच्यावर धारदार कोयत्याने हल्ला करून जखमी केले.
याबाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर, पोलीस उपनिरीक्षक काकड तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र हललेखोर तेथून फरार झाले होते. याप्रकरणी विशाल गोसावी यांच्या तक्रारीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.