वेगवान नाशिक
नाशिकः गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात अनेक भागांत दरोड्याचे सत्र सुरु असून दरोड्याच्या घटना घडताना दिसत आहे. अशातच शहरातील अंबड लिंक रोड परिसरात दरोडा पडल्याची घटना घडली असून एका ६५ वर्षीय वृद्धाचा खून झाला असल्याचं समोर आलं आहे. बच्चू सदाशिव कर्डेल असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशींवर शनिदेवांची राहणार कृपादृष्टी
याबाबत माहिती अशी की, अंबड लिंकरोड परिसरात राहत असलेले कर्डिले कुटुंब दि.25 रोजी सायंकाळी कर्डिले यांच्या घरातील इतर सदस्य बाहेर गेले होते. कर्डिले हे घरात एकटेच असताना अचानक दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. कर्डिले यांना कुणीतरी आल्याची कुणकुण लागताच, त्यांनी बाहेर येऊन पाहिले तर तोंड बांधलेले काही दरोडेखोर असल्याचे समजले. कर्डिले यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी हल्लेखोराने कर्डेल यांच्या घरातील सुमारे सहा ते सात लाखांची रोकड लंपास केल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत माहिती मिळताच परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख, गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ, मध्यवर्ती गुन्हे शाखा वरिष्ठ निरीक्षक आंचल मुदगल, सहाय्यक निरीक्षक किशोर कोल्हे, उपनिरीक्षक संदीप पवार यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरु करण्यात आला आहे.
एलआयसीने आणलीय खास योजना, मिळवा हे मोठे फायदे