वेगवान नाशिक
नाशिकः शहरात एका अठरा महिन्याच्या चिमुकल्याचा मॅजिक बॉल गिळल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बाळाच्या आईने पती विरोधात तक्रार दाखल केली असून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशींवर शनिदेवांची राहणार कृपादृष्टी
याबाबत माहिती अशी की, शितल बोरेडा रा.जाधव संकूल, सातपूर हिचा विवाह २०१८ साली संकेत प्रवीण बोराडे रा.साने गुरुजी नगर, जेलरोड याच्याशी झाला. त्यानंतर लग्नाच्या सहा महिन्यानंतर शितलला सासरचे घालून टाकून बोलत असायचे, त्यावरून आई बाबांमध्ये वाद सुरू होते.
हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन
मात्र या वादाची पार्श्वभूमी असताना शिवांशचे वडील संकेत बोराडे यांनी त्याला खेळण्यासाठी छोटा पिवळ्या रंगाचा मॅजिक बॉल आणला. शीतलने संकेतला तो बॉल शिवांशने गिळला तर त्याच्या जिवाला धोका होऊ शकतो, असे वारंवार बजावले होते. पण संकेतने वैद्यकीय क्षेत्रात काम केलेले असल्याने त्याला या धोक्याची जाणीव होती. त्यामुळे त्याने तो बॉल शिवांशला खेळायला दिला. १२ मे २२ रोजी शीतल घरात नसताना आणि संकेत बोराडे व चिमुकला शिवांश हे दोघेच घरात असताना खेळताना चिमुकल्याने मॅजिक बॉल गिळल्याने त्याची प्रकृती खालावली.
व्हॉट्सअॅप स्टेटसचे लवकरच येतय जबरदस्त नवीन फीचर्स, पहा कोणते
त्यानंतर शितल घरी आली असता शिवांश पलंगावर पडलेला आढळल्याने त्याला पती-पत्नीने तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियेमार्फत मॅजिक बॉल काढण्यात आला. मात्र शिवांशच्या प्रकृतीत सुधारणा न होता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सहा महिन्यांतर शितलने उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संकेत बोराडे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेटीएमला मोठा धक्का! या बॅंकेने पेमेंट एग्रीगेटर परवान्यासाठी अर्ज नाकारला, काय परिणाम होणार?