वेगवान नाशिक
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिर्डी दौऱ्यादरम्यान ज्योतिषांच्या भेटीवरून विरोधक राज्याच्या राजकारणावर हल्लाबोल करत आहेत. ज्योतिषाच्या भेटीवरून विरोधकांकडून खिल्ली उडवल्याचा प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी घेतला असून, आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशींवर शनिदेवांची राहणार कृपादृष्टी
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, त्यांना कोणत्याही हस्तरेखाशास्त्रज्ञ किंवा ज्योतिषाचा सल्ला घेण्याची आवश्यकता नाही कारण त्यांच्या मनगटात इतकी शक्ती आहे की ते त्यांचे भविष्य बदलू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यात शिंदे यांच्या नुकत्याच झालेल्या शिर्डी आणि नाशिक दौऱ्यात ज्योतिषांची भेट घेतल्याबद्दल विरोधकांनी त्यांची खिल्ली उडवली होती. त्यामुळे याला प्रत्यूत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘मला कोणत्याही ज्योतिषाला हात दाखवण्याची गरज नसून तळहाताच्या रेषा बदलण्यासाठी तुमच्या मनगटात ताकद असायला हवी आणि ती ताकद आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्याकडून मिळाली आहे.
तसेच या वर्षी जूनमध्ये महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाले. जूनमध्ये शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून बाहेर फेकले गेले. त्यानंतर त्यांच्या गटापेक्षा जास्त आमदार असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे अशा टीकेला आम्ही घाबरत नाही कारण ३० जूनलाच आम्ही ताकद दाखवली आहे.
समलैंगिक विवाहाला मान्यता मिळण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस