वेगवान नाशिक
राज्यात सध्या योगगुरू रामदेव बाबा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चांना चांगलचं उधाण आलं आहे. राजकीय वातावरण तापल असून रामदेव बाबा चांगलेच अडचणीत सापडले आहेत. महिलांच्या कपड्यांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे थेट राज्य महिला आयोगाने यासंदर्भात रामदेव बाबांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे याप्रकरणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशींवर शनिदेवांची राहणार कृपादृष्टी
दरम्यान रामदेव बाबांनी ठाण्यात घेतलेल्या योग शिबिरामध्ये हा सगळा प्रकार घडला असून यावेळी अमृता फडणवीसांच्या उपस्थितीत रामदेव बाबांनी हे विधान केल्यामुळे राजकारण चांगलेच चिघळले आहे.
रामदेव बाबांवर या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीच्या या नेत्याची मागणी
या सगळ्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून यासंदर्भात येत्या दोन दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश आयोगाने रामदेव बाबांना दिले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोग या तक्रारीची दखल घेऊन रामदेव बाबांच्या विधानाचा तीव्र शब्दांत विरोध करत आहे. त्यामुळे रामदेव बाबांना पुढच्या दोन दिवसांत त्यांच्या वक्तव्याचा खुलासा करण्याचे निर्देश आयोग देत असल्याचं आयोगानं ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.
पेटीएमला मोठा धक्का! या बॅंकेने पेमेंट एग्रीगेटर परवान्यासाठी अर्ज नाकारला, काय परिणाम होणार?