वेगवान नेटवर्क
जर तुम्हाला व्हॉट्सअॅप स्टेटस टाकायला आवडत असेल, तर व्हॉट्सअॅप तुमच्यासाठी एक फीचर घेऊन येत आहे ज्यामुळे तुम्ही स्टेटसवर व्हॉईस नोट ठेवू शकता. त्यात व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे प्रत्येक युजर्सचा व्हॉट्सअॅपचा वापर जास्त आहे. तसेच तुम्हाला यामध्ये अनेक आकर्षक फीचर्स मिळत असून अॅप्स डेव्हलपर्स युजर्सचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर नव-नवीन फीचर्स जोडत राहतात.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशींवर शनिदेवांची राहणार कृपादृष्टी
तर लोकांना व्हॉट्सअॅपचे स्टेटस फीचर आवडते, पण त्याला काही मर्यादा आहेत. म्हणुनच असेच एक व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर समोर आले असून लवकरच तुम्ही त्यावर व्हॉइस नोट्स देखील शेअर करू शकणार आहात. म्हणजे त्यात तुम्ही ऑडिओ अॅड करू शकणार आहात.
योगगुरू रामदेव बाबांच्या वादग्रस्त विधानावरून संजय राऊतांचा सरकारला सवाल
तसेच सध्या व्हॉट्सअॅप या फीचरवर काम करत असून व्हॉट्सअॅपच्या स्टेबल व्हर्जनमध्ये एखादे फीचर आणण्यापूर्वी, त्याची बीटा व्हर्जनमध्ये टेस्ट केली जाते. तर आतापर्यंत तुम्ही व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये व्हिडिओ, फोटो किंवा टेक्स्ट मेसेज शेअर करता. मात्र, आता लवकरच तुम्हाला येथे ऑडिओ शेअर करण्याचा ऑप्शनही मिळेल.
पेटीएमला मोठा धक्का! या बॅंकेने पेमेंट एग्रीगेटर परवान्यासाठी अर्ज नाकारला, काय परिणाम होणार?
रिपोर्टनुसार, यूजर्स या प्लॅटफॉर्मवर 30 सेकंदांचा ऑडिओ शेअर करू शकतील. हा ऑप्शन तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅटप्रमाणेच मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला माइकचा आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही ऑडिओ स्टेटस रेकॉर्ड करू शकता. आणि हे व्हॉइस स्टेटस फक्त त्या लोकांसाठी दिसेल, ज्यांच्याशी तुम्ही शेअर कराल. मात्र, यासाठी यूजर्सला प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन यूजर्स सिलेक्ट करावे लागतील.
एलआयसीने आणलीय खास योजना, मिळवा हे मोठे फायदे