सिन्नरः तालुक्यात आई-मुलास मारहाण करत लाखोंचा ऐवज लंपास


वेगवान नाशिक

सिन्नरः तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे एका टोळक्याने मारहाण करत दरोडा टाकून रोकड संपास केल्याची घटना घडली आहे. सदर घटना दि. २४ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी सिन्नर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना कोर्ट कचेरीचा सामना करावा लागेल

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव पिंगळा येथील भवानी मंदिराजवळ ज्ञानेश्वर कोंडाजी हुल्लुळे यांचे घरी ते टोमॅटो विक्रीसाठी मार्केटला गेले असताना त्यांची पत्नी मुक्ताबाई (50) व मुलगा राहुल (32) हे दोघे सायंकाळी घरातील हॉलमध्ये टीव्ही बघत होते. त्यावेळी पुढील बाजूच्या दरवाजाने अचानक 8 जणांच्या टोळक्याने घरात प्रवेश करून काही कळण्याच्या आत हातात असलेल्या दोरीने हुल्लळे यांच्या पत्नी मुक्ताबाई व मुलगा राहुल यांना बांधून ठेवले. त्यानंतर लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत हुल्लळे यांच्या पत्नीच्या गळ्यातील व कानातील दागिने ओरबाडून कपाटात ठेवलेले 6 तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 20 हजारांची रोख रक्कम घेऊन  बाहेरुन कडी लावून पोबारा केला.

नोकरीची सुवर्ण संधी! भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी एवढ्या जागांवर भरती

त्यानंतर मुलगा राहुलने सरपटत येत फरशीवर पडलेल्या मोबाईलवरुन आपला मित्र राहूल विंचू याला फोन करत घटनेची माहिती दिली असता गावकऱ्यांनी वस्तीकडे धाव घेत राहूल व मुक्ताबाई यांची सुटका केली आहे. या झटापटीत मुक्ताबाई या जखमी झाल्या असून त्यांना ग्रामस्थांनी तात्काळ शिंदे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलीस पाटील सागर मुठाळ यांनी घटनेची माहिती सिन्नर पोलिसांना दिली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या प्रकाराची पाहणी करून पंचनामा केला. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

नवनीत राणांचा बिहार दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *