वेगवान नाशिक
मुंबईः गेल्या दोन दिवसांपासून राज्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून घडामोडी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरून आता विरोधकांनी भाजपावर आणि सत्ताधाऱ्यांवर टीका टिप्पणी करायला सुरुवात केली आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना कोर्ट कचेरीचा सामना करावा लागेल
तसेच राज्यपालांना महाराष्ट्रातून परत पाठवण्याची मागणी ठाकरे गटासह महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. यानंतर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी सीमाप्रश्नावरून केलेल्या विधानावर वाद सुरू असून त्यावर बोलताना संजय राऊतांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.
या कंपनीने 23 वर्षांत गुंतवणूकदारांच्या भांडवलात 190 पट वाढ
ते म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान आणि उकरून काढलेला वाद हे फार मोठं कारस्थान असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तसेच त्याच्यावरून लक्ष विचलित व्हावं, म्हणून बोम्मईंना पुढे करून महाराष्ट्रातल्या काही गावांवर हक्क सांगण्याचा प्रयत्न आहे.जेणेकरून लोकांनी दुसऱ्याविषयाकडे वळावं आणि शिवाजी महाराजांचा अपमान विसरावा, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
Today Gold Silver Price सोने-चांदीच्या दरात वाढ
दरम्यान कर्नाटकचे भाजपाचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या भाजपाच्या उपमुख्यमंत्र्यांवर बोलणं ही ठरलेली स्क्रिप्ट असून शिवाजी महाराजांच्या अपमानाचा जो विषय चाललाय, त्यावरचा लोकांचा संताप कमी करावा आणि या विषयाकडे लक्ष वळवावं यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहून दिलेलं हे स्क्रीप्ट असल्याचं राऊत म्हणाले. तसेच त्याविरोधात उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं असून आम्ही सगळ्यात मोठ्या लढाईसाठी तयार आहोत. ती लढाई कोणत्याही थराला जाईल, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपाला आव्हान दिलं आहे.
राज्यात 5 लाख घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट– एकनाथ शिंदे