वेगवान नाशिक
राज्यात सध्या राजकारणात घडामोडींना चांगलाच वेग आला असून राज्यातील नेत्यांमध्ये या ना त्या कारणावरून एकमेकांवर सारखे टीका, आरोप, टीप्पणीचे सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरून त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना कोर्ट कचेरीचा सामना करावा लागेल
त्या म्हणाल्या, मोठे पप्पू आत्ताच महाराष्ट्रातून गेले, आता दुसरे पप्पूही निघालेत,अशी टीका राणांनी केली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना आम्ही फॉलोव करतो, असंही म्हटल आहे.
त्यानंतर त्या म्हणाल्या की,अशा पप्पू लोकांनाच महाराष्ट्रावर विश्वास नाही, म्हणूनच दुसऱ्या राज्यात जाऊन इतरांसमोर हात पसरत आहेत. त्यांनी इथं महाराष्ट्रात काम केलं असतं आणि गरीब जनतेमध्ये राहिले असते, त्यांच्या प्रश्नांवर काम केलं असतं, असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
या कंपनीने 23 वर्षांत गुंतवणूकदारांच्या भांडवलात 190 पट वाढ
तसेच यांना पदावरून हटवा, नाही तर पूर्ण महाराष्ट्र बंद करू असं म्हणून उद्धव ठाकरे राजकारण करत असून महाराष्ट्र बंद करणं म्हणजे खूप लोकांना अडचणीत आणणं आहे. या पदावर राजकारण करू नये, असंही मत राणांनी व्यक्त केल आहे.
राज्यपालांना हटवण्याबाबत उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला इशारा, म्हणाले..