वेगवान नाशिक
नाशिकः शहरात सध्या साखळी चोरांचा उछ्चाद सुरू असून मॅार्निंग वॅाकवरून फिलोमीना शाळेच्या जवळून परतणा-या महिलेच्या गळ्यातून तीन किलो वजनाची सोन्याची चैन सोनसाखळी चोरांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना कोर्ट कचेरीचा सामना करावा लागेल
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिव्या दिनेश देवानी या सकाळच्या सुमारास सासू सौ. लाजवंती शंकर देवानी यांच्यासोबत नेहमीप्रमाणे घरातून फिरण्यासाठी फिलोमीना शाळा जेलरोड येथून जात होत्या. तेथून घराकडे परतत बिटको चौकाच्या दिशेने येत असताना साधारणतः नऊ वाजेच्या सुमारास भारत पेट्रोलियम समोर असलेल्या दुर्गा डोसा जवळून त्या पायी जात असताना बिटको चौकाकडून जेलरोडच्या दिशेने जाणा-या दुचाकीवर बसून आलेल्या दोन अनोळखी चोरांनी यांची सोन्याची चैन चोरून नेली.
Today Gold Silver Price सोने-चांदीच्या दरात वाढ
दरम्यान दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने चालत्या गाडीवरून त्यांच्या गळ्यात हात टाकून गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने खेचून पळून गेला. सोनसाखळी दोघा चोरांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले होते व डोक्यात ब्राऊन कलरची उलन कॅप घातली होती. त्यामुळे चेहरा बघता आला नाही. त्यात नाशिकरोड पोलिसांचे एकीकडे पाठोपाठ दुचाकी चोरांना पकडण्याचे सत्र सुरूच असून आता पोलिसांनी सोनसाखळी चोरांकडे लक्ष केंद्रीत करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
याप्रकरणी दिव्या दिनेश देवानी रा. सिंधी कॅालीनी जेलरोड नाशिकरोड यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ट पोलिस निरिक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
राज्यात 5 लाख घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट– एकनाथ शिंदे