वेगवान नाशिक
मुंबईः महाराष्ट्रात सध्या सीमावादावरून चर्चा सुरू असून महाराष्ट्र -कर्नाटक या प्रश्नावरून मोठ्या प्रमाणावर वादंग निर्माण झाला आहे. त्यात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे अनेक नेत्यांकडून त्याला विरोध दर्शवला जात असून भाजपवर गंभीर आरोप केले जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा यावरून सरकार वर टीका केली आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना कोर्ट कचेरीचा सामना करावा लागेल
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि केंद्रात सुद्धा भाजपचे सरकार आहे आणि म्हणूनच कोणत्याही मागण्या करण्यात येत आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, मला यांना असा प्रश्न विचारायचा आहे भाजपपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि केंद्रात काँग्रेस आणि मित्रपक्षांचे सरकार होते. मग तेव्हा महाराष्ट्रात आणि कर्नाटक हा प्रश्न सुटला का असा सवाल करत फडणवीसांनी पवारांना टोला लगावला आहे.
नोकरीची सुवर्ण संधी! भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी एवढ्या जागांवर भरती
तसेच बोलताना विचार केला पाहिजे कारण दोन्ही राज्यांत सरकार बदलत गेली दोन्ही राज्यांच्या सरकारने वेळोवेळी भूमिका घेतली. त्यामुळे महाराष्ट्रात यापूर्वी पक्षाचा वाद हा सीमावादात आणला नाही, आणि यापुढेही आणू नये असे फडणवीस म्हणाले आहे.
या कंपनीने 23 वर्षांत गुंतवणूकदारांच्या भांडवलात 190 पट वाढ