वेगवान नाशिक
मुंबईः पत्राचाळ घोटाळाप्रकरणी मागील काही दिवसाआधी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. पण या जामीनीविरोधात संचालनालयाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज सुनवाणी होणार असून संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्याकरता ईडीने प्रयत्न पणाला लावले आहेत.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना कोर्ट कचेरीचा सामना करावा लागेल
दरम्यान संजय राऊत यांच्याविरोधात पुरावे असूनही सत्र न्यायालयानं त्यांना जामीन दिला आहे, असा दावा ईडीने केला आहे. त्यामुळे ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे उच्च न्यायालय काय निकाल देतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज पीएमएलए कोर्टाने मंजूर केला. तब्बल 102 दिवसानंतर संजय राऊतांची तुरूंगातून सुटका झाली आहे.
राज्यपालांना हटवण्याबाबत उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला इशारा, म्हणाले..
तसेच याशिवाय, संजय राऊत यांच्या जामीन प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पीएमएलए न्यायालयाने ईडीला झापले असून न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, पत्राचाळ प्रकरणी दोन्ही आरोपींना बेकायदेशीररीत्या अटक करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे दिवाणी खटले हे मनी लॉन्डरिंग किंवा आर्थिक गुन्हे अशा नावाखाली आणून निर्दोष लोकांना त्यात ओढून त्यांना अटक करून अशा परिस्थितीत आणणे हे न्यायालय मान्य करू शकत नाही.
Today Gold Silver Price सोने-चांदीच्या दरात वाढ