वेगवान नाशिक
बागलाणः तालुक्यात बिजोरसे येथे दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली असून एकजण जागीच ठार झाला आहे. नितीन प्रभाकर काकडे (32) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना कोर्ट कचेरीचा सामना करावा लागेल
याबाबत अधिक माहिती अशी की, बिजोरसे येथील तरुण दि.२३ रोजी रात्रीच्या सुमारास बिजोरसेवरून नाईट ड्युटीसाठी नामपूरकडे क्र. (एम. एच. 41 ए. एच. 406) दुचाकीवर जात असताना अपघात झाला आहे. सदर घटना ही नामपूर साक्री रस्त्यावरील वडाच्या झाडा शेजारी झाली असून रात्रीची वेळ असल्यामुळे कोणाच्याच लक्षात आले नाही.
संजय राऊतांच्या जामिनाविरोधात याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी
त्यानंतर दि २४ रोजी पहाटेच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला नितीन याचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत बाबाजी काकडे, सुनील काकडे यांनी आज रोजी पोलीस ठाण्यात माहिती दिली असून पोलीस कर्मचारी गुंजाळ पाटील यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. त्यानंतर मृतदेह नामपूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. मात्र, अपघाताचे कारण समजले नसून अजूनही अस्पष्टच आहे.
राज्यपालांना हटवण्याबाबत उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला इशारा, म्हणाले..
याप्रकरणी मोटार अपघात कायद्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास जायखेडा पोलीस ठाण्याचे अधिकारी श्रीकृष्ण पारधी करीत आहेत.
नाशिकः शहरात या तारखेपासून पुन्हा हेल्मेट सक्तीचे आदेश