राज्यपालांनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांचा हल्लाबोल


वेगवान नाशिक

मुंबईः  राज्यातील राजकारणात सध्या राज्यपाल यांनी केलेल्या विधानामुळे घडामोडी घडत असून वातावरण चांगलेच तापलं आहे. अनेक नेत्यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली असून टीका टीप्पणी केल्या जात आहे. अशातच  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून राष्ट्रपती, पंतप्रधानांनी याची दखल घेणे आवश्यक असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

आजचे राशी भविष्यः या राशींवर देवी महालक्ष्मीची कृपा होणार

दरम्यान, आज माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर घणाघाती टीका केली असून वादग्रस्त वक्तव्य करणं हा राज्यपालांचा लौकिक आहे. शिवरायांबाबत बोलताना त्यांनी मर्यादा सो़डली असून राज्यपालांच्या या विधानांची पंतप्रधान राष्ट्रपतींनी दखल घ्यावी.आणि राज्यपाल पदावर जबाबदार व्यक्तीची निव़़ड करावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तीवेतनाबाबत शासनाचा मोठा निर्णय

त्यानंतर शरद पवार म्हणाले की, हा जो काही आहे तो वाद आहे असं मला वाटत नाही. कारण राज्यपाल बोलले तेव्हा मी आणि गडकरी तिथे असताना त्यांनी जो उल्लेख केला तो माझ्याबाबत नाही मात्र गडकरींबाबत केला आहे. तसेच राज्यपाल आल्यापासून त्यांनी अनेक गोष्टींवर वादग्रस्त विधाने केली आहे. त्यामुळे समाजात गैरसमज वाढवण्याची खबरदारी घेणं हेच त्यांचं मिशन आहे का, अशी शंका येते. असं शरद पवार यांनी म्हटलंय.

त्यामुळे याचा निर्णय आता राष्ट्रपतींनी आणि पंतप्रधानांनी घेतला पाहिजे, अशा व्यक्तीकडे अशा जबाबदाऱ्या देता कामा नयेत. असं मला वाटतं, असेही शरद पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं मोठ विधान

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *