वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे,
मनमाड,नांदगाव-
नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत नांदगाव तालुका संचालक म्हणून प्रमोद सुदामराव भाबड यांची बिनविरोध निवड झाली.अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी हरेश्वर सुर्वे व अनुजा सुशेन आहेर यांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने प्रमोद भाबड यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
या प्रसंगी तालुक्याचे आमदार सुहासआण्णा कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी प्रमोद भाबड यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी ज्ञानदेव आहेर,हरेश्वर सुर्वे,नांदगाव पंचायत समितीचे माजी सभापती विलास आहेर,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किरण देवरे,नगराध्यक्ष राजेश कवडे,जि. प.सदस्य रमेश बोरसे,माजी सभापती सुभाष कुटे, विष्णू निकम सर,मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती किशोर लहाने,नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे,माजी उपसभापती राजेंद्र सांगळे,मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर संजय सांगळे, मनमाडचे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील,संजय आहेर,अविनाश इप्पर,सुनिल शेलार,राजेंद्र पवार, अमोल नावंदर,राजेंद्र देशमुख,आनंद कासलीवाल आदी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्तरावरील ही पहिली निवडणूक होती.यामध्ये आमदार सुहासआण्णा कांदे यांचे नेतृत्वात प्रमोद भाबड यांची बिनविरोध निवड झाली आहे.त्यामुळे सुहास कांदे आणि समर्थक यांचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र आहे.