वेगवान नाशिक
मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर मुंबईतील विशेष न्यायालय आता 30 नोव्हेंबर रोजी निकाल देऊ शकते. विशेष न्यायाधीश आर.के. एन. रोकडे यांनी 14 नोव्हेंबर रोजी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मलिक यांच्या जामिनावरचा निर्णय राखून ठेवला होता. त्यावर गुरुवारी सुनावणी सुरू होताच न्यायालयाने निकाल देण्यास तयार नसल्याचे सांगितले असून आता 30 नोव्हेंबरला निकाल दिला जाणार आहे.
आजचे राशी भविष्यः या राशींवर देवी महालक्ष्मीची कृपा होणार
दरम्यान मलिक विरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला फरारी माफिया डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी संबंधित आहे. तर मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यावर्षी फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. सध्या मलिक न्यायालयीन कोठडीत असून त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राज्यपालांनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांचा हल्लाबोल
तसेच मलिक यांनी जुलैमध्ये विशेष न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावेळी त्यांनी मनी लाँड्रिंगचा खटला चालवण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर तपास एजन्सीने जामिनास विरोध केला की, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध दाखल केलेला खटला मलिकच्या खटल्याचा आधार मानला जाऊ शकतो.
त्यामुळे याबाबत ईडीने दावा केला होता की आरोपीचे इब्राहिम आणि त्याची बहीण हसिना पारकर यांच्याशी व्यावसायिक संबंध आहेत, त्यामुळे “त्याच्या निर्दोषतेचा प्रश्नच उद्भवत नाही, असं ईडीने म्हटलं आहे.
स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तीवेतनाबाबत शासनाचा मोठा निर्णय