वेगवान नाशिक
नाशिक : शहरात सध्या रिक्षा चालकांची मोठ्या प्रमाणात मुजोरी वाढली आहे. त्यामुळे याला आळा बसण्यासाठी बेशिस्त वाहन चालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई सुरू केली आहे. यामध्ये रिक्षाचे कागदपत्रे, लायसन्स आणि चालकाच्या गणवेशासह रिक्षाची स्थिती अशा सर्वच बाबी तपासल्या जात असून नाशिकच्या विविध भागात प्रादेशिक परिवहन विभागाच्या विशेष पथकाकडून तपासणी केली जात आहे.
आजचे राशी भविष्यः या राशींवर देवी महालक्ष्मीची कृपा होणार
तसेच मुदत संपलेल्या रिक्षा यामध्ये तर थेट जप्त केल्या जात आहे. आणि त्याशिवाय ज्यादा प्रवासी, गणवेश परिधान न करणे, थकीत दंड अशा विविध बाबींची तपासणी केली जात असून अडीच लाखांचा दंड जप्त केला आहे. त्यात चाळीस रीक्षांची तपासणी करण्यात आली असून 17 मुदतबाह्य रिक्षा जप्त करण्यात आल्या आहे.
मुंबई हायकोर्टाने बलात्काराच्या आरोपीला जामीन मंजूर, पण…
तर शहरात आरटीओने अडीच लाख रुपयांचा दंड करत सुरू केलेल्या कारवाईमुळे प्रवाशांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच ठिकठिकाणी आरटीओ पथक दिल्यास होणारी लूटही थांबणार आहे. यामध्ये शहरात 1 डिसेंबर पासून मीटरप्रमाणे भाडे आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यात रिक्षांची तपासणी करून आरटीओने रिक्षा चालकांना मोठा धक्का दिला आहे.
श्रद्धाच्या तक्रारीनंतरही आफताबवर कारवाई का झाली नाही? हे कारण आले समोर