वेगवान नाशिक
नाशिकः नाशिकच्या विमान प्रवाशांसाठी महत्वाची बातमी असून स्टार एअरने नाशिक-बेळगाव विमानसेवेचे बुकिंग पुन्हा सुरू केले असून दि.३ फेब्रुवारी २०२३ पासून नाशिक स्टार एअरची नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू होणार आहे.
आजचे राशी भविष्यः या राशींवर देवी महालक्ष्मीची कृपा होणार
याबाबत छगन भुजबळ यांनी उड्डाण योजने अंतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय नागरी उड्डायन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या निर्देशानुसार, स्टार एअरने नाशिक-बेळगाव विमानसेवेसाठी बुकिंग पुन्हा सुरू केली असल्याची माहिती उद्योजक मनीष रावल यांनी दिली आहे.
तुमचे बॅंकेत काही काम असेल तर लवकर करून घ्या, या महिन्यात एवढे दिवस बँका राहणार बंद
दरम्यान नाशिक ते बेळगाव विमानसेवा जानेवारी 2023 पासून सुरु होणे अपेक्षित होते. मात्र कोविडमुळे उडान योजनेचा कार्यकाळ पूर्ण न करू न शकलेल्या अलायन्स एअरला उडान योजनेअंतर्गत कालावधी वाढवून देण्याचे असल्याचे सिंधिया यांनी पत्राद्वारे माहिती दिली होती. त्यानुसार आता स्टार एअरची नाशिक बंगळुरू ही विमानसेवा लवकरच नाशिककरांच्या सेवेत हजर होणार आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं मोठ विधान
तसेच या मागणीला यश आले असून 3 फेब्रुवारी 2023 पासून स्टार एअरलाइन प्रत्येक शुक्रवार आणि रविवारी नाशिक- बेळगाव विमानसेवा सुरू करणार असून त्यासाठी त्यांनी बुकिंग देखील सुरू केली आहे. तसेच दुसऱ्या कंपन्यांच्या देखील विमानसेवा सुरू करण्यासाठी छगन भुजबळ यांचे प्रयत्न सुरू आहेत.
स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तीवेतनाबाबत शासनाचा मोठा निर्णय