नाशिकः १८ वर्षीय विद्यार्थ्याचा धबधब्यावरून पाय घसरून मृत्यू


वेगवान नाशिक

नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड उंबरपाडा तातापाणी येथे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटनेतील मृत विद्यार्थ्यी हा सुरत येथून साखळचोंड धबधब्यावर सहलीसाठी आला असल्याचं सांगितल जात आहे.

आजचे राशी भविष्यः या राशींवर देवी महालक्ष्मीची कृपा होणार

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्षिल संजाभाई प्रजापती ( वय १८) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो  गुजरात राज्यातून आपल्या महाविद्यालयातील दहा ते बारा मित्रांसमवेत सहलीसाठी आला होता. तसेच तक्षिल हा सुरत येथील सार्वजनिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. तो मित्रांसमवेत पिंपळसोंड येथील कुंडा रिसोर्ट येथे तो सहलीसाठी आला असून दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास हे सर्व जण उंबरपाडा तातापाणी येथील साखळचोंड येथील वाहूटचोंड शॉवर पॉईंट धबधब्यावर आंघोळ करीत होते.

नाशिकः शहरातील रिक्षाचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाची कडक कारवाई

त्यादरम्यान खडकावर शेवाळ असल्याने तक्षिल  याचा अचानक पाय घसरुन पंधराशे फूट खाली पडून खडकावर आपटल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

सदर घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना कळवताच पोलीस व वन कर्मचारी अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून सुमारे दीड हजार फूट खोल दरीतून पंचनामा करून मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने तिवशाची माळी येथे रस्त्यावर काढण्यात आला. त्यानंतर पाच वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र कर्नाटक वादावर एकनाथ शिंदेंनी दिले हे आश्वासन

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *