वेगवान नाशिक
नाशिकः मुंबई आग्रा सर्व्हिस रोड येथे अपघात झाल्याची घटना घडली असून एकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशींवर देवी महालक्ष्मीची कृपा होणार
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक मोहोरा यांच्या वाचनालयाच्या नवीन बांधकाम समोर कौट घाट रोडच्या कोप-याजवळ मुंबई आग्रा सर्व्हिस रोड मुंबई नाका नाशिक याठिकाणी बसचे चालक आरोपी राकेश रमेश परदेशी यांनी निष्काळजीपणे व हयगयीने त्यांच्या ताब्यातील बस चालवल्याने सदर एक अनोळखी इसम वय अंदाजे ३०- ३५ वर्षे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन मृत्यूस कारणीभूत झाला आहे.
स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तीवेतनाबाबत शासनाचा मोठा निर्णय
म्हणुन राकेश रमेश परदेशी यांच्या विरूद्ध मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वरिष्ठ पोलिस निरिक्षक रोहोकले,पोलिस निरिक्षक आहिरे, गुन्हे पोलिस निरिक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली असून याप्रकरणी पो.उप निरिक्षक पाटील अधिक तपास करीत आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं मोठ विधान