वेगवान नाशिक
नाशिकः जिल्ह्यात गुन्ह्याचे प्रमाण खूप वाढले असून सातत्याने खून बलात्कारा सारख्या घटना घडताना दिसत आहे. अशातच आता नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तीवेतनाबाबत शासनाचा मोठा निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मानेनगर परिसरातील एका निवासी वसतिगृहाच्या संचालकाने एका अल्पवयीन मुलीवर आधाराश्रमात महिनाभरापुर्वी बळजबरीने इमारतीच्या पार्किंगमधील पत्र्याच्या खोलीत बोलावून हातपाय दाबून देण्याच्या बहाण्याने अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिग अत्याचार केला असल्याचं उघडकीस आलं आहे.
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारकडून लवकरच पीएफ रकेमत होणार वाढ
याबाबत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी हर्षल बाळकृष्ण मोरे (२८,मुळ रा.सटाणा) यास बेड्या ठोकल्या आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना या करत आहे.
नाशिकः शहरातील रिक्षाचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाची कडक कारवाई