वेगवान नेटवर्क
नवी दिल्लीः Lava ने Twitter वर पुष्टी केली आहे की ते भारतात आपला आगामी स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत असून कंपनीने आपल्या नवीन उपकरणाला Lava Blaze NXT असे नाव दिले आहे. नावाप्रमाणेच हा ब्लेझ सीरिजचा फोन असेल आणि तो बाजारात उपलब्ध असलेल्या दोन ब्लेझ मॉडेल्सची जागा घेऊ शकतो. कंपनीने एका छोट्या टीझर व्हिडिओद्वारे याची पुष्टी केली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशींवर देवी महालक्ष्मीची कृपा होणार
हा फोन 25 नोव्हेंबरला मध्यरात्री 12 वाजता लॉन्च होणार असून या फोनच्या बॅक पॅनलची झलक Amazon च्या लाइव्ह लँडिंग पेजवर पाहता येईल. तसेच Blaze NXT हा कंपनीच्या Blaze हँडसेटचा एक नवीन प्रकार असेल. कंपनी हा फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शनमध्ये देऊ शकते.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं मोठ विधान
तर लीक झालेल्या रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर कंपनी या फोनमध्ये 6.5-इंचाचा IPS LCD पॅनल देऊ शकते. हा डिस्प्ले एचडी + रिझोल्यूशनला सपोर्ट करेल. कंपनी Lava Blaze NXT फोनमध्ये MediaTek Helio G37 प्रोसेसर देऊ शकते. लीकमध्ये असेही सांगण्यात आले आहे की या फोनची रचना हुबेहुब लावा ब्लेझ सारखी असेल. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 13-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. त्याच वेळी, कंपनी सेल्फीसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देऊ शकते.
तुमचे बॅंकेत काही काम असेल तर लवकर करून घ्या, या महिन्यात एवढे दिवस बँका राहणार बंद
हा फोन 5000mAh च्या शक्तिशाली बॅटरीसह येईल, जो 10W चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच या फोनमध्ये HD + रिझोल्यूशनसह 6.52-इंच 90 Hz IPS LCD डिस्प्ले आहे. हे MediaTek Dimensity 700 SoC द्वारे समर्थित आहे आणि 4GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेज आहे.
स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तीवेतनाबाबत शासनाचा मोठा निर्णय