वेगवान नाशिक
मुंबईः राज्यात सध्या अनेक घडामोडी घडत असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे यावरून महाराष्ट्रात चांगलाच वाद पेटला आहे. त्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्य सरकारच्या झालेल्या बैठकीनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आक्रमक झाले असून त्यांनी आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या मुद्द्यावर चिथावणीखोर विधान केले आहे.
आजचे राशी भविष्यः या राशींवर देवी महालक्ष्मीची कृपा होणार
बोम्मई म्हणाले की, कर्नाटकच्या सीमाभागातील कोणतीही जागा देण्याचा प्रश्नच येत नसून याउलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोटसारखे कन्नड भाषिक भाग आमच्यात समाविष्ट केले पाहिजेत. तसेच २००४ पासून महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आतापर्यंत त्यांना यश आलेले नाही आणि मिळणारही नाही,असे त्यांनी सांगितले आहे.
तुमचे बॅंकेत काही काम असेल तर लवकर करून घ्या, या महिन्यात एवढे दिवस बँका राहणार बंद
त्यानंतर बोम्मई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावर चिथावणीखोर विधान केले असून त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. कारण देशाची जमीन, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले आहे.
मुंबई हायकोर्टाने बलात्काराच्या आरोपीला जामीन मंजूर, पण…