वेगवान नाशिक
दिल्लीः जर तुमचे बॅंकांशी काही कामे असतील तर लवकरात लवकर उरकून घ्या. कारण देशभरात डिसेंबर महिन्यात १३ दिवस बॅंका बंद राहणार आहे. त्यात वर्षातील शेवटच्या महिन्याला सुरुवात होणार असून नव्या वर्षाचे स्वागत, ख्रिसमस तसेच इतर काही निमित्ताने सुट्ट्या असणार आहे. त्यामुळे बँका बंद राहणार आहेत. त्यात महाराष्ट्रात ५ दिवस आणि गोव्यामध्ये ७ दिवस बँका बंद असतील.
आजचे राशी भविष्यः या राशींवर देवी महालक्ष्मीची कृपा होणार
तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर महिन्यासाठी बँक हॉलीडेची यादी सादर केली असून त्यानुसार दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवार आणि इतर सुट्ट्या मिळून एकूण १३ दिवस बँका बंद असलीत. त्यामुळे तुम्ही एखादे दिवस बँकेत गेलात आणि बँक बंद असेल तर मोठी अडचण येऊ शकते. त्यामुळे काही महत्वाचे कामे असतील तर आटोपून घ्या.
मुंबई हायकोर्टाने बलात्काराच्या आरोपीला जामीन मंजूर, पण…
दरम्यान बँकांचे सुट्ट्यांचे कॅलेंडर पाहिल्यास विविध राज्ये आणि शहरांमध्ये ३, १२, १९, २४, २६, २९, ३०, ३१ या तारखांना बँकांना सुट्टी असेल. तर ४, १०, ११, २४, २५ डिसेंबर रोजी बँकांना रविवारची, साप्ताहिक सुट्टी असेल. त्यात नाताळही रविवारी आला आहे. म्हणुनच बँकांच्या सुट्ट्या ह्या विविध राज्यांमधील सणावारांवर अवलंबून असतात.
बॅंकेने सादर केलेल्या यादीनुसार ४, १०, ११, १८, २४, २५, या दिवशी बँका बंद राहतील. तर गोव्यामध्ये ४, १०, ११, १८, २४, २५ या व्यतिरिक्त ३ आणि १९ डिसेंबर रोजी बँका बंद राहतील.
श्रद्धाच्या तक्रारीनंतरही आफताबवर कारवाई का झाली नाही? हे कारण आले समोर