वेगवान नाशिक
मुंबई : राज्यातील अनेक कर्मचा-यांना निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन दिले जाते. तसेच सीमेवर लढणा-या स्वातंत्र्यसैनिकांनाही शासनामार्फत निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन देण्यात येत असते. तर राज्य शासनामार्फत स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे जोडीदार यांना सध्या 10 हजार रुपये निवृत्तीवेतन देण्यात येत होते.
आजचे राशी भविष्यः या राशींवर देवी महालक्ष्मीची कृपा होणार
तर यामध्ये राज्य शासनाने सध्या देण्यात येणा-या दरमहा 10 हजार रुपये इतक्या निवृत्तीवेतनामध्ये 10 हजार रुपयांची वाढ केली असून त्यात आता त्यांना दरमहा 20 हजार इतके निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार आहे.
ही वाढ 1 नोव्हेंबर, 2022 पासून लागू राहणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
तुमचे बॅंकेत काही काम असेल तर लवकर करून घ्या, या महिन्यात एवढे दिवस बँका राहणार बंद
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्तीवेतन दुपटीने वाढविण्याबाबत निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे आता स्वातंत्र्यसैनिकांना एक आधार मिळणार आहे.
सीमाप्रश्नावरून संजय राऊतांची शिंदे गटावर जोरदार टीका