वेगवान नाशिक
आजकाल प्रत्येकजण हा पैसे काढण्यासाठी बॅंकेत न जाता एटीएमचा जास्त वापर करताना दिसतो. कारण प्रत्येकजणाला वेळ वाचवण्यासाठी हा पर्याय सोयीचा वाटतो. त्यामुळेच ग्राहकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने महत्त्वाची बातमी आणली आहे.
जर तुमचे या बँकेत खाते असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी एसबीआयने एक नवीन सूचना जारी केली आहे. त्यानुसार नवीन नियम जाणून घ्या अन्यथा पैसे काढताना अडचण येऊ शकते.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आज वाहन खरेदीचा योग
जारी केलेल्या नवीन नियमानुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया खातेदारांना पैसे काढण्यासाठी रजिस्टर्स मोबाईलवर ओटीपी येईल. कारण एटीएममध्ये कार्ड इन्सर्ट केल्यावर पिन टाकल्यानंतर मोबाईलवर एक ओटीपी नंबर येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना एटीएममध्ये जातांना त्यांचा फोन सोबत न्यावा लागणाार आहे.
ट्विटर, फेसबुकनंतर आता गुगलनेही घेतला हा निर्णय
तसेच तुम्हाला तुमचा नोंदणीकृत केलेला मोबाईल नंबर सोबत घ्यावा लागेल कारण तुमचा OTP त्याच नंबरवर येणार आहे.आणि तसेही तुम्ही OTP टाकल्यानंतरच पैसे काढू शकणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे करणं गरजेचे आहे. तसेच 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम काढण्यासाठी ओटीपी आवश्यक असून बँकेची ही सुविधा 1 जानेवारी 202३ पासून लागू होणार आहे.
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सीबीआयच्या अहवालातून मोठा खुलासा उघड