शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार


वेगवान नाशिक

मुंबई : राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर दुसरा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याबाबत चर्चा सुरू आहे. अशातच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडेल, अशी माहिती दिली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आज वाहन खरेदीचा योग  

सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील, तसेच भाजपमधील आमदारांपैकी अनेक इच्छुक मंत्रीमंडळाच्या विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे आता मंत्रीमंडळ विस्तारात कुणाला स्थान मिळेल, याची चर्चा होत असताना काही आमदार उघडपणे विस्तार होत नसल्याने नाराजीही व्यक्त करताना दिसत आहेत.

शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स 450 अंकांनी तर निफ्टी18,300 अंकांनी उसळी

तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांप्रमाणेच महाविकास आघाडीतील नेत्यांचेही या मंत्रीमंडळ विस्ताराकडे लक्ष लागले असून या विस्तारादरम्यानच शिंदे आणि भाजप यांच्या आघाडीमध्ये फूट पडणार, शिंदे यांच्या पक्षातील अनेक अस्वस्थ आमदार मंत्रीपद न मिळाल्याने पुन्हा एकदा बंडखोरी करणार, अशी वक्तव्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहेत. तसेच शिवसेना नेत्यांनी सन २०२३मध्ये मध्यावधी निवडणुका लागणार, असाही दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात काय घडामोडी घडणार याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान याआधी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा होण्यासही बरीच प्रतीक्षा करावी लागली होती. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात  हिवाळी अधिवेशनापूर्वीच विस्तार होईल,असे आशिष जैस्वाल यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता किती आमदारांना आगामी टप्प्यात मंत्रीपद मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

2023 च्या बजेटमध्ये सरकार करू शकते मोठे बदल, करदात्यांवर काय परिणाम होणार

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *