दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सीबीआयच्या अहवालातून मोठा खुलासा उघड


वेगवान नाशिक

मुंबई: गेल्या दोन वर्षापूर्वी दिशा सालियन हिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर या प्रकरणाबाबत मोठी बातमी समोर आली असून सीबीआयने केलेल्या चौकशीत तिचा मृत्यू अपघात असल्याचं सिद्ध झालं आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आज वाहन खरेदीचा योग  

दरम्यान अभिनेता सुशांतसिंह राजपूच्या मृत्यूच्या पाच दिवस आधी दिशाचा मृत्यू झाला होता. सुशांतचा मृतदेह त्याच्या वांद्रे स्थित घरात सापडला होता. तर ८ जून २०२० रोजी दिशाचा मृत्यू झाला असून ती मुंबईतील मालाड याठिकाणी असणाऱ्या गॅलेक्सी रीजेंट अपार्टमेंटच्या १४ व्या मजल्यावरुन पडली होती. त्यामुळे भाजपा नेते नितेश राणे यांनी या दोन्ही प्रकरणांचा एकच संबंध जोडला असल्याचा आरोप केला होता.

ब्रेकिंग! नाशिकजवळ भूकंपाचे धक्के

त्यानंतर  याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर इकॉनॉमिक्स टाइम्सला अशी माहिती दिली की, ‘सालियन प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले होते आणि दोन मृत्यूंचा संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता, कारण सालियनने राजपूतसाठी काही काळ काम केले होते, तिच्या मृत्यूची सविस्तर चौकशी करण्यात आली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अडचणीत वाढ

तर  या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांच्या चॅटमध्ये ब्रँड बिल्डिंगव्यतिरिक्त कोणतेही संभाषण आढळून आले नाही. त्यांनी असे म्हटले की सुशांतने तिच्या मृत्यूनंतर गुगलवर यासंबंध बातम्या सर्च केल्या होत्या, पण असे कुठेच आढळले नाही की तिच्या मृत्यूमुळे अभिनेता आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झाला असावा. मात्र दिशा सालियन प्रकरणात तिच्यावर बलात्कार झाल्याचा, तिचा खून केल्याचा आरोप केला जात होता. पण सीबीआयच्या तपासात हा अपघात असल्याचे समोर आले आहे.

शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स 450 अंकांनी तर निफ्टी18,300 अंकांनी उसळी

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *