महाराष्ट्र कर्नाटक वादावर एकनाथ शिंदेंनी दिले हे आश्वासन


वेगवान नाशिक

मुंबईः  महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यात अनेक योजनांमध्ये गावांचा समावेश कऱण्याची मागणी २०१२ ची असून त्या भागात पाणीटंचाई होती. तर त्यात आता अनेक योजना मार्गी लागत असून पाण्यावाचून कोणतेही गाव इकडे-तिकडे जाणार नाही आणि एकही गाव महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, याची जबाबदारी आमची असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आज वाहन खरेदीचा योग  

या संदर्भात आमची बैठक झाली असून हा जुना वाद असून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यात सीमावाद सामोपचाराने सोडवला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. शिवाय सीमा भागातील लोकांना मिळणाऱ्या योजनांमध्ये आम्ही वाढ केली असून अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यात आरोग्याच्या सुविधा सुरू केल्या असल्याने  याचा या भागातील लोकांना लाभ होणार आहे, असं  शिंदे यांनी नमूद केलं आहे.

ट्विटर, फेसबुकनंतर आता गुगलनेही घेतला हा निर्णय

दरम्यान त्यानंतर शेतकरी नुकसानभरापाईबाबत शिंदे म्हणाले की, आतापर्यंत जो निर्णय नुकसान भरपाई देण्याबद्दल कधीही घेतला गेला नव्हता, तो निर्णय आमच्या सरकारने घेतला.त्यामुळे सगळे नियम-निकष बदलले असून एनडीआरएफचे नियम बाजुला करून भरापाईसाठी निकष दोन हेक्टरचं तीन हेक्टर करण्यात आलं आहे. तसेच हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अस आश्वासनही शिंदे यांनी दिले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अडचणीत वाढ

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *