वेगवान नाशिक
नाशिकः येथील त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या आधारतीर्थ आश्रमात एका चार वर्षाच्या चिमुकल्याचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आज वाहन खरेदीचा योग
याबाबत अधिक माहिती अशी की, त्र्यंबकेश्वरकडे जात असताना अंजनेरी गावाजवळ एका अनाथ आधारतीर्थ आश्रमात आलोक विशाल शिंगारे हा त्याच्या मोठ्या भावासोबत राहत होता. त्यादरम्यान दि. २२ रोजी सकाळच्या सुमारास आलोकचा मृतदेह आधारतीर्थच्या मागील बाजूस एका सफाई कर्मचाऱ्याला आढळून आला. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स 450 अंकांनी तर निफ्टी18,300 अंकांनी उसळी
दरम्यान ही घटना समोर येताच याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिसांना तातडीने घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह उपचारासाठी पाठविण्यात आला आहे. उपचारानंतर आलोकचा गळा आवळून खून झाल्याचे प्राथमिकदृष्टया निष्पन्न झाल्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी सांगितले. त्यामुळे या आश्रमातील एका चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मुलांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आश्रमातील मुलांची, पदाधिकारी, कर्मचारी वर्गाची चौकशी करण्यात येत आहे.
ब्रेकिंग! नाशिकजवळ भूकंपाचे धक्के